मुंबईसोबतच पुण्यातही बाप्पाला ढोल ताशाच्या गजरात निरोप देण्यात येत आहे. पुण्यातील पहिला मानाचा गणपती कसबा गणपती दुपारी 4 च्या आसपास विसर्जन झाला. मोठ्या प्रमाणात भाविक त्याठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर पुण्यातील तिसरा मानाचा गुरूजी तालीम गणपतीचे देखील विसर्जन मागोमाग करण्यात आले.
यानंतर पुण्याचा चौथा मानाचा तुळशी बाग गणपतीचे विसर्जन देखील सायंकाळच्या वेळेस करण्यात आले आणि आता अखेर पुण्यातील पाचव्या मानाचा गणपतीचे म्हणजेच केसरी वाडा गणपतीचे देखील विसर्जन झालेले आहे. पुण्याचा पाचवा मानाचा केसरी वाडा गणपतीच. 7 वाजून 37 मिनिटांनी विसर्जन करण्यात आल आहे. पर्यावरण पूरक पद्धतीने कृत्रिम हौदात या वर्षी देखील केसरी वाडा गणपतीच विसर्जन करण्यात आल आहे. अतिशय भक्तिमय वातावरणात टिळक कुटुंबीयांनी आपल्या लाडक्या केसरी वाडा गणपतीला निरोप दिला आहे.